Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका

Continues below advertisement

Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका

ज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात येण्याची शक्यता असून राज्यातील महिलांना आणखी काही दिवस या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. लाडकी बहीणसाठी अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबरपर्यत वाढण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. २४ सप्टेंबरपर्यंत २.४ कोटी लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ही ऑगस्ट अखेरपर्यंत होती. राज्यात महायुती सरकारने महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, वयवर्ष २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रूपये दिले जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram