Raj Thackeray PM Modi Oath Ceremony : शपथविधीला इंजिन यार्डात का राहिलं? मनसे नेते म्हणाले....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती आहे..
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलावलीय.. या बैठकीत निमंत्रणाच्या मुद्द्यावरुन नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे..
लोकसभेतल्या कामगिरीचा आढावा आणि विधानसभा, महानगरपालिकेच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी ही बोलवली आहे.. पण या बैठकीआधीच मनसे नेत्यांनी भाजपबद्दल नाराजीचा सूर लावलाय...
गरज असल्यास उंबरठे झिजवतात आणि काम होताच दरवाजा बंद करतात अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केलीय..

गरज असल्यास उंबरठे झिजवतात, काम होताच दार लावतात-प्रकाश महाजन..कालचा बाईट
या बद्दल माहित नाही ह्या बद्दल राज ठाकरे बोलतील सुधीर मुनगंटीवार यांचा मला फोन आला होता मी त्यांना माहिती देखील दिलेली आहे.-बाळा नांदगावकर
मी आताच बाळा नांदगावकर यांच्याशी बोललो...त्यांना निमंत्रण मिळाले नाही...पण असे होऊ नये...मी वरिष्ठांना याबाबत सांगणार आहे...कधीकधी निमंत्रण द्यायचं राहून जातं-मुनगंटीवार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola