Zero Hour : विधानसभा निवडणूक वेशीवर, राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे वादाचा परिणाम काय होणार?
Zero Hour: राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे वादाचा परिणाम काय होणार? विधानसभा निवडणूक वेशीवर आलेली आहे.. सरकार नवनव्या योजनांची घोषणा करतंय तर विविध राजकीय पक्ष आकर्षक यात्रा काढत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली.. त्यानंतर अकोला ते ठाणे व्हाया बीड मनसे चर्चेत आहे.. अकोल्यात मनसैनिकांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला.. त्यानंतर राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात मराठा आंदोलकांचा विरोध दिसला.. पण बीडमध्ये उबाठा शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे जात राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या...दोन्ही पक्षांचा डिएनए एकच असल्याने त्याची अपेक्षित प्रतिक्रिया आली नसती तरच नवल...ठाण्यात आक्रमक मनसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या भिरकावत उत्तर दिलं .. मनसेची स्थापना झाल्यापासून दोन्ही बाजूचे सैनिक अनेकवेळा भिडले आहेत, राज आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये, भाषणांमध्ये एकमेंकावर टीका सुद्धा बऱ्याचदा केलीय पण दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी थेट असा हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रसंग..
आणि याच विषयावर आम्ही विचारला होता झीरो अवरमधील आजचा दुसरा प्रश्न..