Raj Thackeray Special Report :राज ठाकरे महायुतीत? फक्त घोषणा बाकी?मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार?
Continues below advertisement
Raj Thackeray Special Report :राज ठाकरे महायुतीत? फक्त घोषणा बाकी?मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत सामील होण्याची चिन्हं आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ आज सकाळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार? तसंच मनसेचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
Continues below advertisement