Raj Thackeray : मनसेला महायुतीत घेण्याबाबत दिल्लीत चर्चा? कुणाचा निरोप घेऊन शेलार शिवतीर्थवर?
Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्नभूमीवर भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील (Delhi) केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे मनसे ठरणार महायुतीचा नवा भिडू ठरणार या चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप युतीच्या (Possibility of BJP MNS Alliance) चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरेंना दिल्ली दरबारी बोलावणं?
मनसेसोबत (MNS) युती (Yuti) करण्यासाठी भाजपकडून (BJP) प्रयत्न सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे. राज ठाकरे यांना युतीत सामील करुन घेण्यासाठी केंद्रातील नेत्यांशी चर्चा सुरु असून राज ठाकरे यांनाही दिल्ली बोलावणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली, यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.