Gudi Padwa : Raj Thackeray दोन वर्षांनंतर घेणार सभा, कोण असणार रडारवर? ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Apr 2022 05:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी या तयारीचा आढावा घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ मार्चला मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो २ एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.