Raj Thackeray छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं घेणार दर्शन, राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?

Continues below advertisement

राज ठाकरे पुण्यातून निघाल्यानंतर जवळच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या  ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुढे औरंगाबादकडे रवाना होतील. औरंगाबादच्या सभेआधी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्याचा निर्णय घेऊन राज यांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षापासून होतेय. त्यावरून राजकारणही रंगलंय. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधल्या सभेत राज ठाकरे हा मुद्दा उपस्थित करणार का याचीही उत्सुकता आहे. राज यांच्या वढू दौऱ्याकडे त्यादृष्टीनं पाहिलं जातंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram