Raj Thackeray PC : Devendra Fadnvis, Uddhav Thackeray यांचा टोलमाफीचा दावा खोडला, व्हिडीओ दाखवले
Continues below advertisement
MNS Chief Raj Thackeray: टोलदरवाढीच्या (Toll Hike) मुद्द्यावर आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः मैदानात उतरले आहेत. आपल्या लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची वक्तव्य काय केलेली, ते राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत मांडलं. तसेच, टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय-काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं? या सर्वाचा लेखाजोखा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडला आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, टोलनाके बंद केले नाहीतर टोलनाके जाळून टाकू असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
Continues below advertisement