Ketaki Chitale : केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवरून घमासान, राज ठाकरेंनीही दिला कडक शब्दात समज

केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवरून राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता खुद्द राज ठाकरेंनीही केतकी चितळेला कडक शब्दात समज दिलीय.. आपल्या सभांमधून पवारांवर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंनी पत्रक काढून केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर तीव्र शब्दात निषेध दर्शवलाय. कुणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नय़े असं राज ठाकरेंनी या पत्रकात  लिहिलंय. तर अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नसल्याचं मतही राज ठाकरेंनी पत्रकातून व्यक्त केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola