Maharashtra Politics: निवडणुकांसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, 'शिवतीर्थ'वर संध्याकाळी ६ वाजता महत्त्वाची बैठक
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 'शिवतीर्थ' (Shivtirth) या त्यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी ६ वाजता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, विदर्भात (Vidarbha) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस असूनही, महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचे चित्र अस्पष्ट आहे. विदर्भामध्ये सध्या तरी सर्वच पक्षांच्या संदर्भात 'स्वबळ' किंवा 'मैत्रीपूर्ण लढत' असंच राजकीय समीकरण दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय रणनीती आखणार आणि पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी आघाड्यांमध्ये जागावाटपावरून गोंधळ असल्याने स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement