राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, ग्रंथालयासंदर्भात दोन दिवसांत नोटिफिकेशन काढणार, सामंतांकडून आश्वासन
ग्रंथालयं सुरु करा म्हणून एबीपी माझानं सुरु केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे. लॉकडाऊनंतर ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीसंदर्भात राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचित केली. यावेळी ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं आहे.
ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात एबीपी माझाने जे प्रश्न उपस्थित केले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारनं दिली आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी भेट घेतली. सर्व विश्वस्तांनी आपली बाजू मांडली. तसेच त्यांचं म्हणणं आणि अडचणीही सांगितल्या. या सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांनी आठवडाभरात ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असं सांगितलं आहे.