Raj Thackeray Aaditya Thackeray : राज आणि आदित्य ठाकरेंचा बर्थ डे,एकाच बॅनवर शिवसैनिकांच्या शुभेच्छा

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance मुंबई :  राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या ठाकरे बंधूंचे जरी मनोमिलन झालं नसलं  तरी दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांचे युतीसाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होत आहे. अशातच आता हे प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंच्या मुख्यस्थानापर्यंत येऊन पोहचले आहे. करण उद्धव ठाकरेंच्या युवा सेनेनं ठाकरे काका पुतण्याचे एकत्र बॅनर लावत काका-पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेना भवन समोर लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकत्र शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच एकाच बॅनर वर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना युवा सेनेने अशा पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा  दिल्या आहेत. त्यामुळे बॅनरवरचं चित्र आता नेमकं कधी सत्यात येणार हे पाहणे (MNS Shiv Sena Alliance) महत्वाचे ठरणार आहे. 

सेना भवनासह शिवतीर्थसमोर काका पुतण्याचे एकत्र बॅनर 

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या काका पुतण्यांचा फोटो प्रथमच एका बॅनरवर झळकतांना पाहायला मिळतोय. युवासेनेकडून हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स तयार करण्यात आले असून 13 जून रोजी होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या पोस्टर्सवर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे पोस्टर्स सेना भवन समोर त्यासोबतच राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थसमोर लावले जाणार आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola