Raj Thackeray Speech:'तेव्हा गांभीर्याने घेतलं नाही, आता...', मतदार याद्यांवरून ठाकरेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन (EVM) आणि मतदार याद्यांमधील (Voter Lists) कथित गोंधळावर आवाज उठवला आहे. 'ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावर टकटक व्हायला लागली, त्यावेळेला कळालं की निवडणुकीत काय प्रकार सुरू आहेत', अशा शब्दांत ठाकरे यांनी इतर पक्षांना त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली. आपल्याला आठवत असेल तर दोन हजार सोळा-सतरामध्ये मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता, असेही ते म्हणाले. त्यावेळी एमआयजी क्लबमध्ये (MIG Club) पत्रकार परिषद घेऊन आपण हा मुद्दा मांडला होता, पण तेव्हा अनेक पक्षांनी याचं गांभीर्य ओळखलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. आता मात्र सर्वांना यातील गांभीर्य कळू लागले आहे, असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement