Raj Thackeray Speech : मतदार यादीत ९६ लाख बोगस मतदार, ठाकरेंचा गंभीर आरोप

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'आगामी निवडणुकांसाठी तयार केलेल्या मतदार यादीत जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्रात भरलेले आहेत,' असा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी केला. मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी ८ ते १० लाख, तर पुणे आणि नाशिकमध्येही अनेक बोगस मतदार घुसल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक पक्षांना संपवण्यासाठी हा डाव रचला जात असून, अशा पद्धतीने निवडणुका घेणे हा मतदार आणि लोकशाहीचा अपमान आहे, असेही ते म्हणाले. जर अशाच प्रकारे निवडणुका होणार असतील, तर प्रचार का करायचा, उमेदवार का उभे करायचे आणि मतदारांनी मतदान का करायचे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola