Raj Thackeray Khalapur Toll : टोलनाक्यावर वाहतुककोंडीपाहून राज ठाकरे भडकले, स्वत: खाली उतरले...

Continues below advertisement

Raj Thackeray Khalapur Toll : टोलनाक्यावर वाहतुककोंडीपाहून राज ठाकरे भडकले, स्वत: खाली उतरले...

मुंबई: राज्यातील टोल नाक्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या राज ठाकरे आज थेट खालापूर टोल नाक्यावर (Raj Thackeray At Khalapur Toll Plaza) स्वतः उतरले आणि त्यांनी ठाकरे शैलीत टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना हिसका दाखवला. त्यांनी या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता रिकामा करून दिला. पुण्यावरून मुंबईला येताना ट्रॅफिक जॅममुळे राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सर्व गाड्या सोडल्या. या ट्रॅफिकमध्ये एक अँब्युलन्सही अडकली होती, राज ठाकरेंच्यामुळे तिला रस्ता मिळाला. 

राज ठाकरे त्यांचा पिंपरीतील कार्यक्रम संपवून मुंबईला येत होते. त्यावेळी खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम असल्याचं त्यांना दिसलं. त्या ठिकाणी पाच किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची माहिती होती. त्यानंतर राज ठाकरे स्वतः टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram