Raj Thackeay: 'मराठी भाषा गौरव दिवस जल्लोषात साजरा करा'- राज ठाकरे ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 08:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२७ फेब्रुवारी, अर्थात मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करा असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय. गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव धुमधडाक्यात साजरा झाला पाहिजे असं पत्र राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी प्रसिद्ध केलंय. प्रत्येक भागात, प्रभागात आणि विभागात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करा, जेणे करुन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे, अशा शब्दात राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे..