Sanjay Raut PC | राजभवनाचा वापर राजकीय कारणासाठी होतोय, खासदार संजय राऊत यांचा आरोप
Continues below advertisement
राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु असल्याचं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचे सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे युद्ध थेट राज्यपालांकडून नाही तर त्यांच्या आड भाजपकडून खेळण्यात येतंय असं सांगत राजभवनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय हे राज्यपालामुळे रखडले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
Continues below advertisement