Rais Shaikh : लोकसभा निवडणुकीत सौदेबाजी सुरू - रईस शेख

Rais Shaikh : लोकसभा निवडणुकीत सौदेबाजी सुरू - रईस शेख भिवंडी शहरात समाजवादी पक्षा मध्ये दलालांचे राज्य प्रस्थापित झाले असून त्या विरोधात बंड पुकारत भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या कडे सुपूर्द केला होता. या राजीनामा नाट्य नंतर त्याचे तीव्र पडसाद भिवंडी शहरातील आमदार रईस शेख यांच्या समर्थकां कडून उमटायला सुरवात झाली होती.त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा भिवंडीत रईस शेख दाखल होत त्यांनी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.ही घोषणा करीत असताना भिवंडी शहरात समाजवादी  पक्षांमध्ये दलालांचा शिरकाव झाला असून या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सौदेबाजी सुरू केली आहे असा आरोप रईस शेख यांनी केला असून पक्षाच्या भल्यासाठी भिवंडी शहरातील अशा दलाल प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून हाकलून द्यावे अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola