Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज
Continues below advertisement
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आजपासून ८ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या दरम्यान घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर. तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Continues below advertisement