Sindhudurga Rain: सिंधुदुर्गात जोरदार वाऱ्यासह पाऊस ABP Majha

कोकणातही मान्सून पूर्व पावसानं काल हजेरी लावली. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला. काल झालेल्या पावसामुळे आंबोली घाटात धुक्याची चादर पसरली होती. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील  गावे गेल्या 12 तासांपासून अंधारात आहेत. महावितरणकडून सध्या दुरुस्तीचं कामं हाती घेण्यात आली आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola