Reels in Railway : रेल्वेत व्हिडिओ रिल्स कराल तर जेलमध्ये जाल! रेल्वेचा नवा कायदा काय? ABP Majha
Continues below advertisement
ट्रेनमध्ये रील्स आणि व्हिडीओ काढण्याची हौस पूर्ण करणाऱ्यांबाबतची... रेल्वेमध्ये रील्स किंवा व्हीडिओ काढल्यास आता जेलची हवा खावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांत रेल्वेत आणि रेल्वे परिसरात रील्स करणं , सेल्फी व्हिडिओ काढणे अशा विविध प्रकारे व्हिडीओ रेकॉर्ड करणे हे प्रकार वाढलेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न काही प्रवाशांनी उपस्थित करत असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बेकायदेशीर व्हिडिओ बनवणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे याविरोधात कलम १४५ आणि १४७ नुसार कारवाई करण्यात येणारेय़. तसंच रील्स किंवा व्हीडिओ काढल्यास एक हजार रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवासही होऊ शकतो अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ . शिवराज मानसपुरे यांनी दिलीय.
Continues below advertisement