Raigad Red Alert | रायगडमध्ये Red Alert, नद्या दुथडी भरून वाहत, मच्छीमारांना इशारा

रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा Red Alert देण्यात आला आहे. सकाळपासून रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात दमदार पाऊस झाला. त्यानंतर आता दक्षिण भागातही पावसाची रिमझिम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील काळ, कुंडलिका आणि सावित्री नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. काळ नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासह कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. "मच्छीमार बांधव असतील, कोळी बांधव असतील किंवा इतर जे समुद्रात माशेमारी करण्यासाठी जाणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षिततेचा आणि शक्यतो समुद्रात न जाण्याचा सल्ला आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे." असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola