Raigad Rains : रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; कर्जत, महाड तालुक्यात रस्त्त्यांवर पाणी
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे महाड एमआयडीसी परिसरातील कांबळे फाटा ते हायकलदरम्यान पाणी साचलंय. कर्जत तालुक्यातही अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. कर्जत-दहिवलीला जोडणाऱ्या उल्हास नदीच्या पुलालाही पाणी लागलंय. त्यामुळे दहिवली गावातील ग्रामस्थांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. १९८९ नंतर पहिल्यांदाच पावसाळ्यात अशी स्थिती झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तिकडे दहिवलीतल्या गणेशघाट परिसरात पाणी साचलंय. इंदिरानगर, कोतवालनगर येथे २-४ फूट पाणी साचलंय. कडाव-चांदई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Waterlogging Raigad Monsoon Update Mahad Karjat Heavy Rains Maharashtra Rains Update Monsoon 2021 Raigad Rains