Raigad Rain | रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपलं, कोकणात सध्याची पावसाची स्थिती काय?
राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.