Raigad MIDC : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात शेतकऱ्यांचा गोंधळ, डोलवी MIDC ला ग्रामस्थांचा विरोध
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील पेण येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. डोलवी एमआयडीसीला विरोध असणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीच्या 11 गाव समितीच्या सदस्यांनी गदारोळ घातला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी डोलवी एमआयडीसीला विरोध करत गदारोळ घातला. डोलवी एमआयडीसीसाठी आवश्यक असलेल्या 2100 एकर जमिनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेनं या प्रकल्पाला पाठिंबा दिल्यास त्याला विरोध केला जाईल अशी भूमिकाही ग्रामस्थांनी मांडली आहे.
Continues below advertisement