पवारांचा माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून वांद्र्याच्या सीनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर निशाणा: फडणवीस
शरद पवार साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, वडिलांना वाटतं आपल्या मुलांना काही कळत नाही. म्हणून ते माझ्याबद्दल बोलले असतील. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तशीच भावना असते. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. कदाचित माझ्या खांद्यावरुन त्यांना वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची असेल. तुम्ही देखील काही तरी करा असं सांगायचं असेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.