Eknath Shinde | दोषी विकासकासह कामासाठी परवानग्या देणाऱ्या सर्वांवर कारवाई होणार : एकनाथ शिंदे

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही 19 ते 20 रहिवासी अडकले आहेत. या दुर्घटनेत समीर सय्यद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आमदार अवधूत तटकरे यांनी दिली. दरम्यान एनडीआरएफची टीम  घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola