Raigad Building Collapse | मृत्यूला हरवून मोहम्मद परतला, चिमुकल्याची 19 तास ढिगाऱ्याखाली झुंज

Continues below advertisement
'देव तारी त्याला कोण मारी', याचा प्रत्यय रायगडमधील इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यादरम्यान आला. महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तब्बल 19 तासांनंतर साडेतीन वर्षांच्या मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं. यावेळी सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला. टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram