Rahuri Onion Protest : निर्यातशुल्काच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातशुल्काबाबत घेतलेल्या निर्णायविरोधात राज्यभर पडसाद उमटू लागलेत..केंद्राच्या या निर्णयाविरोधात अहमदनगरमध्ये स्वाभीमानी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले..राहुरी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडत स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले.. तसंच सरकार निर्यात धोरण मागे घेत नाही तोपर्यंत बाजार समितीतील कांद्याचे लिलाव सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय..विशेष म्हणजे विक्रीसाठी कांदा आणलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola