Rahul Narwekar Vidhan Sabha : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी ?

Continues below advertisement

Rahul Narwekar Vidhan Sabha : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी ?

 राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर  हेच विधानसभा अध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राहुल नार्वेकर हे रविवारी दुपारी 12च्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील. यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram