Rahul Narvekar : 'अध्यक्षांच्या अखत्यारितला निर्णय घेणाचा अधिकार कोर्टाकडे नाही'
सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षानं घटनाबाह्य निर्णय घेतला तरच सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येतो, मात्र अध्यक्षांच्या अखत्यारितला निर्णय घेणाचा अधिकार कोर्टाकडे नाही, असं नार्वेकर म्हणाले.. तसंच, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या ताज्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.