Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्ज

Continues below advertisement

Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्ज

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमत मिळवलं. भाजपला 132, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ 236 इतकं झालं आहे. महायुतीकडे मोठं संख्याबळ असल्यानं विधानसभा अध्यक्ष तीन पक्षांमध्ये  कुणाकडे जाणार याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा भाजपकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपनं त्यांच्याकडे घेतलं होतं. भाजपनं त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram