Rahul Kulkarni मधली ओळ 278 : अजित पवार, सुप्रिया सुळेंकडेच सूत्र?, जयंत पाटलांची नाराजी काय सांगते?

Rahul Kulkarni मधली ओळ 278 : अजित पवार, सुप्रिया सुळेंकडेच सूत्र?, जयंत पाटलांची नाराजी काय सांगते?

ABP C Voter Survey On NCP Chief: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काय होणार, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातही कायम आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार असून 2024 साली लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा वेळी शरद पवारांनी ही घोषणा केली. देशाच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या शरद पवार यांच्या या निर्णयावरून अनेक अर्थही काढले जात आहेत. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांनी निर्णय मागे घेतला नाही तर राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं आहे.  अशा राजकीय वातावरणात सी-वोटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे, हा सर्वे 'एबीपी माझा'चा नाही. या सर्वेक्षणात शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण व्हावे, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. लोकांनी आश्चर्यकारक उत्तरे दिली आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola