Rahul Kanal : राहुल कनाल यांचा सेनेत प्रवेश करणार, कनाल यांच्या विभागातील युवासेनेची पदं स्थगित
abp majha web team
Updated at:
30 Jun 2023 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 जुलै रोजी ठाकरे गट पालिकेविरोधात विराट मोर्चा काढणार आहे. पण त्याच दिवशी ठाकरेंना धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेना प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षाला जाहीर रित्या जय महाराष्ट्र करत असल्याचंही राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे.