Rahul Gandhi visit Tilak Bhavan : राहुल गांधी शुक्रवारी टिळक भवनात जाणार, स्वागताची जोरदार तयारी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी टिळक भवनमध्ये सजावटीला सुरूवात झालेली आहे. 1 सप्टेंबरला इंडियाच्या पत्रकार परिषद झाल्यानंतर राहुल गांधी हे टिळक भवनच्या दिशेने रवाना होतील.यावेळी माटूंगा पासुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित असतील. तसंच टिळक भवनमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राहुल गांधी संबोधित करणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी ठळक भवन मध्ये सुरू झालेली आहे