Rahul Gandhi vs Ravi Shankar Prasad : खाती गोठवली ; काँग्रेस संतापली

Rahul Gandhi vs Ravi Shankar Prasad : खाती गोठवली ; काँग्रेस संतापली आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठवल्याप्रकरणी काँग्रेसने आज जोरदार हल्लाबोल केला. सुप्रीम कोर्टात जाण्याआधी काँग्रेस अध्यक्ष खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आज पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. बँक खाती गोठवत देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला केंद्र सरकार पंगू बनवत आहे अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केलीय. अवघ्या १४ लाखांसाठी खाती गोठवल्यामुळे काँग्रेस २८५ कोटी रूपयांचा वापर करू शकत नाही. कार्यकर्त्यांना देण्यासाठी, पक्षाच्या जाहिराती देण्यासारख्या सामान्य गोष्टींसाठीही पैशांचा वापर पक्षाला करता येत नाही, कार्यकर्त्यांना साधं रेल्वे तिकीट काढण्यासाठीही पैसे नाहीत असं राहुल गांधी म्हणाले. तर भाजपने काँग्रेस कांगावा करत असल्याचा पलटवार केला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola