Rahul Gandhi Voter Claim | राहुल गांधींच्या दाव्याबाबत एबीपी माझाचा रियालिटी चेक
Continues below advertisement
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या मतदाराने चार ठिकाणी मतदान केल्याचा दावा केला होता. या दाव्याची एबीपी माझाने पडताळणी केली. एबीपी माझाने केलेल्या पडताळणीत राहुल गांधी यांचा दावा खोटा असल्याचे समोर आले. आदित्य श्रीवास्तव मूळचे लखनऊचे असून, २०१६ मध्ये नोकरीनिमित्त ते मुंबईत आले. २०२१ पर्यंत मुंबईत राहिल्यावर ते बंगळूरूत शिफ्ट झाले. आदित्य यांनी लखनऊ येथे प्रथम वोटर कार्ड तयार केले होते. मुंबईत आल्यावर त्यांनी येथेही वोटर कार्ड अपडेट केले आणि २०१९ च्या लोकसभेला मतदान केले. त्यानंतर ते बंगळूरूत शिफ्ट झाल्यावर त्यांनी पुन्हा वोटर कार्ड अपडेट केले आणि कर्नाटक निवडणुकीत मतदान केले. नव्या जागी राहायला गेल्यावर जुना रेकॉर्ड पुसला जातो असा आदित्य श्रीवास्तव यांचा समज होता, मात्र तसे झालेले नाही. आदित्य श्रीवास्तव यांचे नाव जाहीर पत्रकार परिषदेत घेतल्यामुळे ते राहुल गांधींवर नाराज आहेत. त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांनी कधीही एकाच निवडणुकीत एकाच वेळी दुसऱ्या ठिकाणी मतदान केले नाही. राहुल गांधींनी त्यांची खासगी माहिती सार्वजनिक केल्याने कुटुंब दुःखी आहे.
Continues below advertisement