Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्या डोक्यातील चिप चोरीला, फडणवीसांचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं काँग्रेस शिष्टमंडळाला भेटीचं निमंत्रण दिलं आहे. आज दुपारी एक ते तीन दरम्यान भेटीची वेळ देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं आहे. राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली. "महाराष्ट्रातून मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चीपची चोरी झाली आहे," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीत काँग्रेस शिष्टमंडळ निवडणूक आयोगासमोर आपले मुद्दे मांडणार आहे.