Rahul Gandhi Diwali: 'आता तुमच्या लग्नाच्या मिठाईची ऑर्डर कधी?', राहुल गांधींना मिठाईवाल्याचा थेट सवाल!

Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त दिल्लीतील जुन्या आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. 'आम्ही तुमच्या लग्नाच्या मिठाईची ऑर्डर ची वाट पाहतोय,' असं म्हणत दुकान मालकाने राहुल गांधींना त्यांच्या लग्नाबद्दल विचारले, ज्यावर राहुल गांधींनी केवळ स्मितहास्य केले. या भेटीदरम्यान, राहुल गांधी यांनी स्वतः इमरती आणि बेसनाचे लाडू बनवण्याचा प्रयत्न केला आणि मिठाई बनवण्याच्या कलेबद्दल कारागिरांशी संवादही साधला. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, दिवाळीची खरी गोडी फक्त थाळीत नसते, तर नात्यांमध्ये आणि समाजातही असते. राहुल गांधी यांचे वडील, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना या दुकानातील इमरती खूप आवडत असे, अशी आठवणही दुकान मालकाने सांगितली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola