Rahul Gandhi Full Speech : आदिवासी शब्दाचा अर्थ सांगत राहुल गांधींचे मोदींवर आरोप

Continues below advertisement

Rahul Gandhi Full Speech : आदिवासी शब्दाचा अर्थ सांगत राहुल गांधींचे मोदींवर आरोप  राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतल्या समारोपाला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतल्या समारोपाच्या निमित्तानं १७ मार्च रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांना भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित राहण्यासाठी आज निमंत्रण देण्यात आलं. महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेसकडून निमंत्रित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राहुल गांधींच्या सभेत शक्तिप्रदर्शन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram