Rahul Gandhi Speech:सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं आश्वासन,राहुल गांधींची घोषणा
Continues below advertisement
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांवर आश्वासनांची अक्षरश: खैरात केली.
Continues below advertisement