Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर, ठाण्यात पोहोचणार
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर, ठाण्यात पोहोचणार
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकवरुन आज जव्हार, वाडा, मोखाडा करत पालघर वरुन थेट ठाण्यामध्ये दाखल होणार आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधींचे अनेक रोड शो त्याप्रमाणे छोट्या-मोठ्या सभाही होणार आहेत. स्थानिक परिस्थिती पाहून राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे समोर येताना पाहायला मिळत आहेत. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हा आपल्या बाजूने करण्यासाठी राहुल गांधींनी आज प्रयत्न केला. आज पालघर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ही यात्रा असणार आहे. त्यामुळे आदिवासी भाग म्हणून आदिवासी जनतेच्या प्रश्नावर राहुल गांधी लक्ष केंद्रित करतील.