Rahul Gandhi Vote Chori: हरियाणा मतदार यादीत ब्राझिलियन मॉडेल? राहुल गांधींचा गंभीर आरोप
Continues below advertisement
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणातील मतदार यादीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत, गांधींनी दावा केला की, 'कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका ब्राझिलियन मॉडेलने २२ वेळा मतदान केले'. गांधी यांनी 'H Files' सादर करत म्हटले की, हरियाणात २५ लाख बनावट मतदार असून, प्रत्येक आठ मतदारांपैकी एक मतदार बनावट आहे. या कथित घोटाळ्यामुळे हरियाणातील काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. याशिवाय, उत्तर प्रदेशातील भाजप सरपंचाने हरियाणात मतदान केल्याचा दावा करत, त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement