Maratha Reservation | Sharad Pawar पापाचे धनी, Vikhe Patil यांचा गंभीर आरोप!

Continues below advertisement
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे. समाजात दुही निर्माण करण्यामागे शरद पवारच आहेत, असा आरोप त्यांनी केला. आरक्षणाच्या वादात शरद पवार पापाचे धनी आहेत, असेही विखे पाटील म्हणाले. १९९४ साली जो निर्णय झाला, त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी समाज समावेशक निर्णय घेतला असता तर आज प्रश्नच निर्माण झाला नसता, असे विखे पाटील यांनी नमूद केले. "समाजामध्ये दोही निर्माण करायची आणि विसराव निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला याचं, येथे पापाचं धनी कोण आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा मोर्चेकऱ्यांनी पवार साहेबांना जाऊन विचारले पाहिजे की त्यांनी हे असे सामाजिक विषय का निर्माण केले, असेही विखे पाटील यांनी म्हटले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola