Latr News : Latur मध्ये संतप्त गावकऱ्यांनीच पिसाळलेल्या लांडग्याला ठेचून मारलं! Special Report

Continues below advertisement
लातूरच्या (Latur) देवळी (Deoni) पंचायत समिती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला (Forest Department) संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनीच लांडग्याला ठार मारले. 'त्या बारा लोकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला जबाबदार कोण?', असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. या लांडग्याने दोन दिवसांत एकूण १२ जणांवर हल्ला केला, ज्यात दोन चिमुकल्यांचाही समावेश होता. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उदगीरच्या (Udgir) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी नऊ जणांवर हल्ला झाल्यानंतरही वनविभागाचे अधिकारी 'नॉट रिचेबल' असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत होती. अखेर संतप्त गावकऱ्यांनीच कायदा हातात घेत लाठ्या-काठ्यांनी या लांडग्याचा पाठलाग करून त्याला ठार केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola