Buldhana : पूर्णा नदीला पूर, येरळी पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात, दोन तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे धरणे भरले आहेत मोठे धरणाचे दरवाजे उघडले असून लाखो क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे मात्र या पाण्याच्या फटका धरणाखालील गावांना बसला आहे खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडले आहेत त्यामुळे धरणाखालील राहेरी बुद्रुक, किनगाव राजा, किनगाव जट्टू या गावातील शेतकऱयांना या पुराचा फटका बसलाय.
या पुरामुळे हजारो हेक्टर शेत जमिनीतील शेतातील पिकांची नासाडी झाली आहे त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचला नाही , शेतकरी प्रचंड अडचणीत आला असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
Continues below advertisement