Puntamba Rail Roko Protest : स्वातंत्र्यदिनी पुणतांबा गाव बंद, रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन
Puntamba Rail Roko Protest : स्वातंत्र्यदिनी पुणतांबा गाव बंद, रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन
देशात कोरोना आल्यानंतर अनेक निर्बंध आले.. सर्वसामान्यांसह उद्योग जगत संकटात आले होते... देशातून कोरोना गेला मात्र कोरोनासाठी लावलेले निर्बंध अद्यापही तसेच असल्याचे आता समोर आला आहे... ऐतिहासिक अशा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावात रेल्वेच्या थांब्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली... कोरोनापूर्वी थांबत असलेल्या रेल्वेंना थांबा मिळावा ही मागणी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आज पुणतांबा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी थेट रेल्वे ट्रॅक वर जात रेल रोको आंदोलन केलं.... विशेष म्हणजे या आंदोलनात हजारो पुरुष महिलांचं विद्यार्थी देखील सहभागी झाले होते... तीन तास केलेल्या आंदोलनानंतर अखेर तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्याचा आश्वासन मिळालय.. तर इतर चार एक्सप्रेस गाड्यांसाठी 21 ऑगस्टला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक ठेवण्यात आली आहे...