Punekar again DJ : लाऊडस्पीकर चालणार नाही, पुण्यात डीजेविरोधात आंदोलन

Continues below advertisement

Punekar again DJ : लाऊडस्पीकर चालणार नाही, पुण्यात डीजेविरोधात आंदोलन 

ण्यातील गुडलक चौकात मोठ्या संख्येने पुणेकर एकत्र येत साऊंड आणि डीजेला विरोध केला आहे.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
पुण्यातील अनेक नागरिक पेठ परिसरात राहतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना अक्षरशः घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्याची वेळ येते, असा दावा नागरिकांनी केला आहे.तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
यंदा मात्र “लाऊडस्पीकर चालणार नाही”, अशी आक्रमक भूमिका पुणेकरांनी घेतली आहे.
कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, अशी पोलिसांकडे नागरिकांची मागणी आहे.
“आम्हाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. नियमांचं उल्लंघन होत असेल तर पोलिसांनी कारवाई करावी,” अशी भूमिका पुणेकरांनी घेतली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola