Talathi Bharti Protest : तलाठी भरतीतील घोटाळ्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक, पुण्यात सरकारचा निषेध
तलाठी भरतीची मेरीट लिस्ट याच आठवड्यात लागणार आहे. तर भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमिता झाली नाही, असं स्पष्टीकरण महसूल खात्यानं दिलंय. तलाठी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची काल मंत्रालयात बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांपेक्षा वाढीव गुणांवरुन विरोधकांनी भरती प्रक्रियेवर आरोप केलेत. त्यानंतर महसूल खात्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून, वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय.