Vijaysinh Mohite-Patil | मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच : विजयसिंह मोहिते पाटील | ABP Majha
मी कुठेही गेलेलो नाही, मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. मी पक्षासोबत आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच आहे, असेही मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि त्यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील एकाच मंचावर आले होते.